बाण फुलांचे
बाण फुलांचे
सर सर सर आला पाऊस,
वीज ऊजली अंधार.
मिठीत घे तू देई साजणा
तव बाजूंचा आधार
तुझ्या नि माझ्या डोळ्या मधले
इंद्रधनू ते मीच रेखीले
जग दोघांचे बसवू अपुले.
दे साथ तुझी दमदार .....१.
वस्त्रे चिकटून बसली अन् गा.
सावज गवसे आज अंगा.
बाण फुलांचे उरात घुसता
सुख देतो अनिवार...२.
इथे न कोठे दिसे निवारा.
धसमुसला हा ओला वारा.
हिरवाई ला सुचले गाणे.
सुरेल हिरवेगार....३. &
nbsp;
प्रियकर तू मी तुझी प्रेयसी.
दूर उभा का भिजत राहसी.
भिजली अंगे जलधारानी.
उरी उठला अंगार...४.
मोर पिसारा उंच उभारून.
करीमादिशी प्रणयाराधन.
तृण मखमाली गा लीच्या वरी.
रस रसू दे शृंगार ...५.
मिठीत तुझिया भान हरू दे.
ही अमृत बरसात झेलू दे.
कवेत घे ना मज ओलेती.
तुझाच तो अधिकार ...६.
lyrics by
राजेंद्र वैद्य कल्याणकर