बालपन
बालपन
सुंदर ते बालपण
खोडकर वृत्ती, मजा आणि मस्ती
सगळ्यांसोबत असायची दोस्ती
नाही कोणाची भीती,नाही धास्ती
पक्की कट्टी आणि पक्कीच दोस्ती
खोट्या पैशात यायचा मोठा पाऊस
त्यातच तरायची आमची कागदी नौका
आजीच्या गोष्टी आणि त्यातली
सुंदर असे काऊ,चिऊ आणि मनी मॅऊ
चोर पोलीस, खेळासोबत होता लपंडाव
मैदानी खेळालही असे मोठा भाव
दिवाळीला बांधून मातीचे किल्ले
खेळायचे एकत्र सगळे चिल्ले पाल्ले
मामाच्या गावी जायची असायची वेगळीच गंम्मत
अस व्हावे एकदा मिळावे वरदान
एकदा परत भोगावे सुखी ते बालपन
