STORYMIRROR

काव्य चकोर

Tragedy

4  

काव्य चकोर

Tragedy

बालमजूर

बालमजूर

1 min
410

तो एक बाल सुकुमार कपबशा विसळत होता

उभ्या आयुष्याच्या रवी जसा मंथनी घुसळत होता..

शिव्या घाली मालक तो निमुटपणे ऐकत होता

जणू असुराचे सहाय्य सूर निष्पाप घेत होता..!!


तो स्वतःच होऊन शिव मग हलाहल पचवत होता

भविष्याचं उज्वल रत्न मनामधे सजवत होता..

मी पाहत होतो त्यास केवळ तो सर्वांपासून दूर होता

समीप जाता जाणले तो बालमजूर केवळ होता..!!


कधी मिळेल हक्काचे अमृत हा प्रश्न मनास पडला होता

विषपान करणारा तो शिव माझ्यात कुठे दडला होता..??

जग सारे बागडत होते पण तो मंथनात गुंतला होता

आयुष्य त्याचे जसे हलाहल तो स्वतःच त्यात घुसळला होता..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy