STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Others

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Others

बाजार

बाजार

1 min
378

भावनांचा चालला व्यापार आहे

भास्कराने पाहिला अंधार आहे


भाकरीचे पेटलेले युद्ध मोठे

माणसांचा वाढला संहार आहे


तूच माझा मी तुझी हे सांगताना

साजणाने मोडला संसार आहे


आवडेना तेच गीत गात होते

का मनाची आज झाली हार आहे


कोणता माझा खरा प्रेमी कळेना

रोमिओंचा भोवती बाजार आहे


मज विधात्या का दिला तू जन्म येथे

मानवांचा दानवी संसार आहे


श्वास माझा मोकळा होता जरासा

वाढला कोव्हीडचा आजार आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy