अवयव दान
अवयव दान
तुमच्या मनाच्या आत
असावी सतकृत्याची वात
उजळाल आसमंतात
दान देवोनीया.
रक्त दान हे ची
श्रेष्ठ असे दान
असावे सर्वांना
समाजाचे भान.
करी आवयव दान
त्यासी श्रेष्ठांचा मान
ऐकावे हो सर्वांनी
देवोनीया कान.
देह दात्याचे हो प्रती
त्यासी पूर्ण ज्ञानाची प्रचिती
मनुष्य काय त्यास
देव ही हो वंदती.
