STORYMIRROR

Kedar Shewalkar

Others

3  

Kedar Shewalkar

Others

तळापासून मनाच्या

तळापासून मनाच्या

1 min
431


मी वृक्ष एक वठलेला

माझ्या मनी गोठलेला

पाण्याचा साठा आटलेला

जमिनीच्या तळाला.


मी होतो कधिकाळी हिरवासा

पानगळ होऊन बहरलेला

फळांने सदैव लगडलेला

वादळ उन पावसाशी झगडलेला.


माझ्या खांद्यावर गोपाळांचा मळा

झोका टांगलेला आकाशाच्या सफरीला

बाळकृष्णाला फळे द्यायला

उरी दगडांचाही मार खाल्लेला.


आता गात्र अन मनाचा ही तळ सुकलेला

माझे हाल आता कुणी ही विचारेना

ऊनमळुन देह हा पडलेला

अगदी तळापासून मनाच्या.


Rate this content
Log in