STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Inspirational

4  

DATTA VISHNU KHULE

Inspirational

अट्टाहास का

अट्टाहास का

1 min
181

वंशाचा दिवा

पाहीजे आम्हाला

मुलगा हवाच 

हाच ध्यास मनी

सांगतो आम्ही जनी


मुलीला का नाही 

मिळत सम्मान

मुलगा का

मुलीपेक्षा महान

का हा भेदभाव


मुलीही आता मुला

पेक्षा नाही कमी

देतात नव्या 

यशस्वीतेची हमी


आज मुलीचा

हर एक क्षेत्रात 

गाजतो डंका

मुली कमी नाही

यात नाही शंका


आज देशभर

महिला आघाडीवर

अनेक क्षेत्रात 

उमटविला वेगळा ठसा

घेतला त्यांनी

जनसेवेचा वसा


मग मुलगाच हा

अट्टहास का

मुलगा मुलगी 

मानू सम्मान

शिक्षण देऊ

बनवू महान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational