अतिवृष्टी
अतिवृष्टी
मेघ करी अती वृष्टी
शेतकरी धास्तावला
पिक जाय हातातून
म्हणे निसर्ग कोपला १
सर्वदूर अतिवृष्टी
माजलासे हाहाकार
गावे पूरग्रस्त होती
उभी पिके स्वाहाकार २
अति वृष्टी संहारक
होतो संपत्तीचा नाश
पाणी आडवा, जिरवा
तुटे निसर्गाचा पाश ३
विनवितो इंद्र देवा
आलो तुझ्या चरणासी
नको आता अतिवृष्टी
दास सांगे वरुणासी ४
