STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Inspirational

3  

VINAYAK PATIL

Abstract Inspirational

अस्तित्व

अस्तित्व

1 min
246

अस्तित्व दिव्यामधल्या 

ज्योतीप्रमाणे असतं

किती शिल्लक राहिले 

ते त्याला माहित नसतं ||१||


अस्तित्वाला या मनाच्या 

कप्प्यात साठू वाटतं 

अचानक या हवेच्या 

झुळूकीने ही ते बुझतं ||२||


अस्तित्व हे देव्हाऱ्यात 

आनंदाने उजळतं 

जिवलगांच्या साथीने

ते प्रेमानं प्रकाशतं ||३||


अस्तित्वाच्या आठवणी 

मागे सोडून विझतं 

काजळीच्या या खुणांनी 

दिव्याला त्या चिकटतं ||४||


विझलेल्या मनी दुःख 

काही काळच टिकतं

नव्या ज्योतीच अस्तित्व 

परत जन्माला येतं ||५|| 


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Abstract