असंही प्रेम
असंही प्रेम
परसबागेतील अंगणी आपुल्या
बहरावी संध्या प्रीतीची
चुंबकापरी जवळ यावे
अन कळी मिटावी मिठीची।।
मावळणाऱ्या संधी प्रकाशात
वाटे सौंदर्य तुझे न्याहळावे
क्षितिजावरी मावळणाऱ्या रवीत
मला तुझे प्रतिबिंब दिसावे ।।
रम्य अशा सांजवेळी
फक्त तू अन मीच असावे
विस्तीर्ण नभाच्या साक्षीने
आपण प्रेमाचे रंग भरावे ।।
अलगद वाऱ्याच्या स्पर्शाने
येऊन हळूच तुला छेडावे
मुखचंद्रावर याव्यात बटा
अन तासनतास मी तुला पहावे।।

