STORYMIRROR

Mrudula Raje

Inspirational

4  

Mrudula Raje

Inspirational

अस्मान - भरारी

अस्मान - भरारी

1 min
288

आकाशाला गवसणी घालायला निघाला आहे तो |

आभाळातही रंग भरायची क्षमता बाळगतो ||


पंख पाखरांचे घेऊन अस्मानी उडू जो पाहतो |

गरुड-भरारी घेईन नभांतरी, ही जिद्द मनी धरतो ||


बालपणी खेळला अंगणी, चेंडू हाती घेऊनी |

मायेने निजवीतसे माता, चंद्र त्यास दावूनी ||


परी त्यास लागली ओढ नित सूर्य-दर्शनाची |

दिशा दावी जो जगा, तेजाने तळपत्या भास्कराची ||


आकांक्षा बाळगी मनी तो भव्य भविष्याची |

पायऱ्या चढताना शिडीच्या, साथ आत्मविश्वासाची ||


ध्यास लागला एक मनाला, करू आभाळाला स्पर्श |

आदित्याला कवेत घेऊन करीन साजरा हर्ष ||




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational