STORYMIRROR

आ. वि. कामिरे

Tragedy

4.0  

आ. वि. कामिरे

Tragedy

अश्या या झाडाला व्यथेचे मरण दिले

अश्या या झाडाला व्यथेचे मरण दिले

1 min
166


माहीत नाही हे झाड इथे आहे किती वर्षापासून

त्याला पाहून एवढेच म्हणावेसे वाटते आवर्जून

या माणसांनी बांधली सर्वत्र इमारत सारी

आणि खाताहेत पदार्थ भारी

पण तरीही या झाडाचे दुःख 

कोणी समजू का शकले नाही

जे लोकांना कळले नाही, ते मी पाही

या झाडाच्या फांद्या अश्या लटकत आहेत

जणू ते अश्रु ओघळत आहेत

ते झाड दिसले थोडे वाकलेले

अगदी पातळ शरीर असलेले

या माणसांच्या जाचाला कंटाळलेले

हे झाड आहे आत्ता खूप थकलेले

त्या झाडाचे दुःख मला आता समजले 

काय झाले ? काय घडले ? ते आता उमजले

आजूबाजूला आहे वस्त्या खूप सारी

त्यात माणसेही राहतात निरनिराळी

विचार करतो हा झाड एकदा

काढीतो आठवण मित्रांची दहादा

काय करावे परी त्याला समजेना

जावं म्हटलं मित्राकडे परी लवकर मरण येईना

असतो हा दुःखात फार काळ

कारण त्याची होती जोडलेली नात्यांशी नाळ

काय माहीत हा झाड जगू कसा शकेल ?

या माणसाच्या गर्दीत तो कसा टिकेल ?

आजही मला तो दिसतो आहे दुःखात 

माहीत नाही होईल कधी तो सुखात ?

अशी झाली खूप व्यथा झाडाची सांगून 

त्यानेही खूप बघीतले त्याचे मरण मागून

या अश्या झाडाची कथा इथेच नाही संपले

कारण या झाडाला व्यथेचे मरण दिले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy