अश्रूंची माळ
अश्रूंची माळ


आज अचानक सामोरी आलीस
विरलेला श्वास पुन्हा धडधडला
खोलवर विसावलेल्या क्षणांना
नव्याने खळखळता मार्ग सापडला
अश्रूंची माळ करू लागली
पापण्या आड गर्दी
तुझ्या आठवणीत रमल्याची
देवू लागली वर्दी
तुझ्या असण्याने बदलली
भोवताली सुगंधी हवा
तुझ्या सोबतीत घेतो आहे
पुन्हा अनुभव नवा
उजाळा देवू साठवलेल्या
अनमोल या वेदनांना
हलका करू या भार जरासा
बोलूनी एकमकांना