STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

अश्रू

अश्रू

1 min
263

डोळ्यातील अश्रू पडता 

त्यांचा आवाज होत नाही 

याचा अर्थ असा नाही की 

दुराव्याचे दुःख मला होत नाही 


शब्दांनाही कोडे पडावं 

अशीही काही माणस असतात 

किती आपलं भाग्य असतं 

जेव्हा ती आपली असतात 


डहाळीवरून पडणारे थेंब 

मध्येच अडकून बसतात 

क्षणीक सुखाचे दाखवी स्वप्न 

अमानुषपणे सोडून जातात 


नजरेतील सामर्थ्याचे दर्शन 

शब्दांना कसे मिळणार 

पण प्रेमात पडल्याशिवाय 

तुम्हाला कसे कळणार 


जीवनात काही मागण्यापेक्षा

काहीतरी देण्याला महत्त्व असतं 

कारण मागितलेला स्वार्थ असतो

आणि दिलेलं प्रेम बहरलेलं असतं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract