STORYMIRROR

rani jawanjal

Inspirational

3  

rani jawanjal

Inspirational

अशा माझ्या वडिलांना सुपर हिरो नाही तर काय म्हणायचे...

अशा माझ्या वडिलांना सुपर हिरो नाही तर काय म्हणायचे...

1 min
241

ज्यांचं न दिसणार प्रेम 

आम्हाला भरभरुन प्रेम देते, 

अशा माझ्या वडिलांना, 

सुपर हिरो नाही तर काय 

म्हणायचे ......... 


काही कमी नको पडायला 

म्हणून स्वत:च्या इच्छा आकांक्षा 

मागे ठेवते, 

अशा माझ्या वडिलांना , 

सुपर हिरो नाही तर काय म्हणायचे........ 


आम्ही आयुष्यभर सावलीत 

राहावे म्हणून स्वत: आयुष्यभर 

उन्हात झीजते, 

अशा माझ्या वडिलांना , 

सुपर हिरो नाही तर काय म्हणायचे........... 


कधी स्वत: उपाशी राहून 

आम्हाला अन्नाचा घास 

भरवते , 

अशा माझा वडिलांना, 

सुपर हिरो नाही तर काय म्हणायचे........... 


ज्यांचा नुसता खांद्यावर 

हात जरी असला, 

तरी संकटात लढण्याची 

 प्रेरणा मिळते, 

अशा माझ्या वडिलांना, 

सुपर हिरो नाही तर काय म्हणायचे......... 


माझ्या यशाची चमक जेव्हा मला 

तुमच्या डोळ्यात दिसते, 

अशा माझ्या वडिलांना, 

सुपर हिरो नाही तर काय 

म्हणायचे......... 


         हिरो हे केवळ पडद्यावर नसतात 

      तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि    

                तुम्ही 

            माझे हिरो आहात ........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational