STORYMIRROR

rani jawanjal

Others

3  

rani jawanjal

Others

स्वप्न मला पडले

स्वप्न मला पडले

1 min
167

स्वप्न मला पडले  

स्वप्नात आज काय घडले  

भारत झाला म्हणे कोरोनामुक्त , 

पण काळजी घेणं झालं सक्त 

नियम मात्र नेहमी पाळावेच लागणार 

 विनाकारण बाहेर जाणे टाळावेच लागणार ....... 

  

स्वप्न मला पडले  

स्वप्नात आज काय घडले  

भारत झाला म्हणे प्रदूषणमुक्त, 

पण कापडी पिशवी वापरण झालं सक्त 

नियम मात्र नेहमी पाळावेच लागणार  

प्रदूषण टाळावंच लागणार......... 


स्वप्न मला पडले  

स्वप्नात आज काय घडले  

भारत झाला म्हणे भ्रष्टाचारमुक्त , 

पण इमान वापरण झालं सक्त 

नियम मात्र नेहमी पाळावेच लागणार  

भ्रष्टाचार टाळावाच लागणार........


साहित्याला गुण द्या
लॉग इन