मनी जागली देशभक्तीची भावना.......
मनी जागली देशभक्तीची भावना.......
स्वातंत्र्याचा सोहळा जरी
झाला आता जुना
आज माझ्या मनी जागली
देशभक्तीची भावना
सणांचे रूप आले होते
साऱ्या त्या शाळांना
ऐकत होते चिमुरडे सारे
कौतुकाने त्या भाषणांना
देशभक्तीची जाण भारी
छोट्या त्या चिमुकल्यांना
मी ही भरला आवाज
अन् साथ दिली घोषणांना
आज माझ्या मनी जागली
देशभक्तीची भावना
आज चाळलं मनाने
इतिहासाच्या पानांना
नव्याने आठवलं मी
त्या महान बलिदानांना
शौर्याच्या कथा साऱ्या
दिसू लागल्या डोळ्यांना
पुन्हा जाणवल्या लढ्याच्या
त्या साऱ्या खूणा
आज माझ्या मनी जागली
देशभक्तीची भावना
आज पुन्हा गुणगुणली
देशप्रेमाची गाणी
आठवली आज मला
क्रांतीची ती कहाणी
झेंड्याला वंदन करून
गर्व झाला श्वासांना
छातीत भरून घेतलं मी
देशभक्तीच्या साऱ्या भावनांना.
