STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Romance Tragedy

असेन मी नसेन मी

असेन मी नसेन मी

1 min
245

तुझ्या निरागस हसणयाने,

पुन्हा मला जगायला शिकवलं होत.

तुझ्या गहिऱ्या डोळयांनी,

पुन्हा हसायला शिकवलं होत.

तुझ्या येण्याने आयुष्यात,

पुन्हा वसंत बहरला होता.

तुझ्या अथांग डोळ्यात,

जीव एक वेडा अडकला होता.

दुःख तर कोसो दूर होत माझ्यापासून.

जगणं माझं सुरु झालं फक्त तुझ्यापासून.

खरच इतकं छान प्रेम असत?

 समजलं होत मला फक्त तुझ्या नजरेत बघून.

 कसे कोणी इतकं सुंदर निरागस असावे.

 तुला पाहून अश्रूंनी ही काही शिकावे.

 नाही माहीत आज ही,

 का आणि किती प्रेम करते तुझ्यावर.

 तू त्या अथांग समुद्रा सारखा,

 फिदा आहे रे मी वेड्या तुझ्या गहिऱ्या डोळ्यांवर.

 आता भरवसा ही नाही उरला,

 माझा माझ्या श्वासावर.

 विश्वास ठेव फक्त तू माझ्या या शब्दांवर.

 असेन मी नसेन मी,

 सापडेन मी तुझ्याच हाताच्या रेषांवर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance