असे काही घडायाला हवे होते
असे काही घडायाला हवे होते
असे काही घडायाला हवे होते
वसंताशी पटायाला हवे होते
कळ्यांनीही खुलायाला हवे होते
अबोल्याने मनाचे वाढले अंतर
मुके भांडण मिटायाला हवे होते
किती खोदून आलो वाळवंटाला
जरा पाझर फुटायाला हवे होते
तुझा पाऊस आल्यावर घरी माझ्या
मला थोडे भिजायाला हवे होते
तुला दिसले किती काटे गुलाबाला
सुगंधाने दिसायाला हवे होते
तुला पत्रात सारे मी कळवल्यावर
तुही उत्तर लिहायाला हवे होते
किती फोडून झाले बांध अश्रूंचे
जरा आपण हसायाला हवे होते
किती उपवास केले मी तुझ्यासाठी
तुझे दर्शन घडायाला हवे होते

