STORYMIRROR

Komal Patil

Inspirational Others

2  

Komal Patil

Inspirational Others

असे धुंद मी व्हावे

असे धुंद मी व्हावे

1 min
79

मनाने आदेश दिला हा

असे काही सुचावे,

छंद लागे वाचण्याचा 

जसे चित्त रमावे


लेखणीने हात धरून

भावनांना अस्तित्व द्यावे,

स्वतःच्याच हृदयापर्यंत

माझे काही शब्द जावे


मित ह्या मनातले हे

असे काही रुजावे,

विश्वात ह्या लेखणीच्या

असे धुंद मी व्हावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational