STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy

4  

sarika k Aiwale

Romance Tragedy

अनोळखी वाटे सारे नाते

अनोळखी वाटे सारे नाते

1 min
269

शब्दात राम का नाही 

जगण्यात या अर्थ नाही 

मरणात या माझिया 

कुणाचाही दोष नाही 


व्यर्थ चालल्या त्या वाटा 

नीरर्थक सहिल्या व्यथा 

प्रवासात जीवनाच्या या 

कुणाचीच साथ नाही 


भाव गोठलेल्या नदीचा 

पुर असा कोरडा वाही 

आसवांच्या माझिया या 

कुणालाच पाश नाही 


खोल मनीच्या गर्तेत 

वादळाचा उद्रेक होई 

भाव ओठावरती येता 

कोणाची त्यास तमा नाही 


एकाकी या जगण्याला 

सावलीस रात्र सोबतीला 

बोल या शब्दातील माझा 

कोणा एकासाठी तर नाही...


जग अश्रूत दू:ख मोजतो 

श्वास अश्रूत सुख सांडतो 

दिल्या घेतल्या वचनात 

कोणाच मना तू दोष पाही


आल्या गेल्या त्या आठवणी 

जाहल्या मनी त्या साठवणी 

पुसतील शब्द माझेच मला 

कोणाचे मना तू दु:ख साही 


मन तोलून का वागले 

क्षण विसरुन का जगले 

हिरे माणके ओंजळीत या 

कोणाचे आहे हे दू:ख सांडले 


एकाकी जगते मी सार्यात 

एक झाड मोकळ्या रानात

दुवे काजव्यांचे मनात या 

कुणाचा जीव कसावीस होई 


शब्दास शब्द लिहिल होता 

क्षणाचा तो सहवास होता 

नजरेतील कोलाहलचा या 

एकच तर तो पुरावा होता


ओळखीच्या बांधावरती 

अनोळखी नाती संगती 

सल जुनी अंतरीची या 

काहुन अनोळखी नाते जगती 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance