Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shivam Madrewar

Tragedy Inspirational


3  

Shivam Madrewar

Tragedy Inspirational


अनोखे व्यासपीठ

अनोखे व्यासपीठ

1 min 35 1 min 35

कोण त्यावरती आपले जीवन घडवतो,

त्यावर महामानव भ्रष्टाचार गाजवतो,

अन्यायाला तो निमंत्रणाने बोलावतो,

आणि हे सर्व एक व्यासपीठ निमुटपणे पाहतो


अनेक शेतकरी त्यावरतीच आत्महत्या करतो,

प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना पाहतो,

खऱ्या युद्धामध्ये रक्ताचा पाऊस बरसतो,

आणि हे सर्व एक व्यासपीठ असाहाय्यपणे सहन करतो


राजकारणी माणूस त्यावरती येतो,

विरोधकांवरती टिकेवर टिका करतो,

त्याच व्यासपीठाला नंतर अपशब्द वापरतो,

आणि एक व्यासपीठ हे सर्व ऐकून रात्री रडतो


कलाकारांना तो नेहमी मदत करतो,

साहित्य व संस्कृतीला तो वाव देतो,

आपला इतिहास तो अभिमानाने मांडतो,

आणि हे सर्व काही एक व्यासपीठच करतो


विजेता त्याच्या पाया पडूनच पुरस्कार घेतो,

हा कवी त्याच्यावरतीच अनेक काव्य रचतो,

नाटककार त्याला स्वत:चा देव मानतो,

आणि एक व्यासपीठ खरा साहित्याकार घडवतो


भुतकाळाच्या सर्व चुका तो मोठ्याने सांगतो,

भविष्यातील संकटांची पुर्वसूचना तोच देतो,

वेळे सोबतच वेळेच्या वेगाने तो धावतो,

आणि हे सर्व उत्तम व्यासपीठच करतो


कधीतरी-कोठेतरी असे व्यासपीठ मी पाहतो,

तिथे प्रत्येक नाटककार त्याच्या नाटकात हरवतो,

कोण त्या नाटकातून लवकर बाहेर येतो तर कोण शेवटपर्यंत टिकतो,

कारण जो व्यासपीठाला आदर देतो तोच इथे चमकतो


Rate this content
Log in

More marathi poem from Shivam Madrewar

Similar marathi poem from Tragedy