अंधांच्या व्यथा..
अंधांच्या व्यथा..
कधी पाहिले
न चंद्र चांदणे
नयनी हे उणे
मज दाविले..
सूर्य प्रकाश ...
वर्णन ऐकले
स्वप्नात दिसले
दर्शन आस ...
सुंदर रूप
देवाने दिधले
न मज दिसले
तेच स्वरूप ...
नयनी पाणी
चमकले मोती
तेवतात ज्योती
पणती वाणी ...
नयनरम्य
जन म्हणतात
कां वाखाणतात ?
मज न गम्य ...
देवा विनंती
तुझ्याच चरणी
दुर्देवी करणी
न द्यावी अंती...
