STORYMIRROR

Sandhya Vaidya

Tragedy

3  

Sandhya Vaidya

Tragedy

अंदाज

अंदाज

1 min
164

येतो का आज उद्याचा अंदाज 

मृत्युचा शोक की लग्नाचा साज ।।


नित्य नवी पहाट, संदेहाचा जश्न 

प्रश्नाला उत्तर कि उत्तराला प्रश्न ।।


दाहक स्फोट ,वादळ वारे थंड 

हे गुंडा राज कि राजाचे गुंड ।।


कुठे सुर सनईचे, लुटतात लाज

 विचित्र नियम अनितीचे राज ।।


खुन, अत्याचार तुरंत पुन्हा पुन्हा

गुन्ह्याची शिक्षा कि शिक्षेसाठी गुन्हा ।।


घातपातही येथे बंधुत्वाविरूद्व

युद्धासाठी बुद्ध कि बुद्धासाठी युद्ध। ।


तो प्रसंग डोळ्यापुढून असा काही सरकला

जणू माळेतील एक मणी खळकण निसटला ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy