अनाथांची माय
अनाथांची माय
नुसत्या तुझ्या असण्याने
आधार मिळाला अनाथांना
भूक शमवण्या पोटाची
भीक मागून जगविले मुलांना...!!
संकटावरी मात केलीस
झालीस अनाथांची माय
पोरका झाला आज महाराष्ट्र
तुझ्या लेकरांनी खाल्ली हाय...!!
वनवास तुझ्या नशिबी जरी
राहीलीस तू माई खंबीर
प्रत्येक अनाथांची आई होवून
दिलीस तू सा-यांना धीर....!!
कित्येक लेकरांची माय होवून
घडविलेस अनेकांचे भविष्य
काळ कैसा वैरी जाहला
हिसकावून नेले आयुष्य....!!
विचारांना तुझ्या उंची होती
हिमालयासम भक्कम माई
अनाथांची माय तू जाहली
सपकाळांची सिंधूताई......!!
नियतीने जरी डाव मांडला
ना मानलीस माई तु हार
कर्तृत्वाने तू जीवंत राहणार
प्रत्येक ह्रदयाच्या आरपार...!!
