अनाथांची माई
अनाथांची माई
होती वाट खडतर जरी
सोसले अंगी घाव कितीतरी
पाय चालले अनवाणी
हार ना कधी मानली
परिस्थितीशी दोन हात करत
लढली ही रणरागिणी
ना कुटुंबाची साथ,
नाही डोक्यावर मायेचा हात
अविरत कष्ट,
संघर्षमय हा प्रवास किती यातना जीवाला
नाही मुखी पडले दोन घास
तरिही स्मशानात करून भाकर
लढली या जगाशी
दिसता मुल कोणी निराधार
कवळालले त्याला
आपल्या ह्रदयाशी
अनाथांना दिला आधार
नाही घेतली कधी
आपल्या कर्तव्यातून माघार
माया,ममता भरभरून वसे जिच्या ठाई
अनाथांची झाली ती माई
माय माऊली ही थोर
थोर संघर्षाची ही गाथा
नमतो माई तुझ्या चरणी माथा..
