STORYMIRROR

Pratibha Vibhute

Inspirational

3  

Pratibha Vibhute

Inspirational

अमूल्य संस्कार

अमूल्य संस्कार

1 min
227

जन्म होता जडण घडण 

मानवाची बघा जीवनात

होता सहज सुंदर संस्कार

जाते आयुष्य हो आनंदात


एकत्र कुटुंब पद्धत चांगली

आजी,आजोबांची शिकवण

नातवंडांवर होती संस्कार

आनंदात जाते ते बालपण


बालपणीच होता संस्कार 

कधीच न विसरता कोणी

आयुष्याच्या वाटेवर मग

कशी होणार ती अनहोनी?


भारतीय संस्कृती अमूल्य

संस्काराचे मोल जाणावे

वडिलधारी मंडळी नी गुरू

यांचे संस्कार सदैव मानावे


 संस्कार रूपी ठेवा जतन

 कर आयुष्यभर मानवा

माणुसकीची जाणीव होई

कळतील प्रेमरूपी भावना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational