अलगद मोती टिपला जेव्हा
अलगद मोती टिपला जेव्हा
अलगद मोती टिपला जेव्हा,
नकळत ती समोर आली
शब्दबद्ध भावनेला लोचनात टिपू लागली....
अलगद मोती टिपला जेव्हा,
नकळत ती समोर आली
हळुवार पाकळ्यांना
नकळतच उलगडू लागली ,
अलगद मोती टिपला जेव्हा
नकळत ती समोर आली
क्षणभंगुर आसवांना हृदयात साठवून लागली
चंचल शितल मूर्ती तिची
मनी माझ्या घर करी
अलगद मोती टिपला जेव्हा
नकळत ती समोर आली!!!....

