निसर्ग
निसर्ग
1 min
167
चिंब भिजलेले गुलमोहर हा
खिडकीतून खुणावतो मला
ऋतु-गंध मोहरूनी त्या क्षणाला
बहरूनी रिझवतो मला
नभ पांघरूनी रक्त गंधित लाली
बावरल्या मला स्पर्शुनी गेली
अलगदच शहारले मी चिंब सरीत
तुझा सहवास सुखावतो मला
