बाबा
बाबा
1 min
182
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला
साथ तुमची लाभली
त्यांच्या सुखासाठी
सारं काही सहन केलंत
त्यांना मिळावं चंद्राचं चांदणं
म्हणून तळपत्या उन्हात ही
कष्टाच सोनं केलंत
दिवस नाही रात्र नाही
सण नाही नी वार नाही
अविरत कष्ट करत होतात
काडी काडी जोडत होतात
आपल्या चिमण पाखरांसाठी
सार्थक झालं कष्टाचं
साथ लाभली ती ची जिने
मनातल्या भावनांचा पेक्षाही
कर्तव्य श्रेष्ठ मानलं
आता थोडी उसंत घ्या
विसाव्याच्या क्षणालाही
पांग तुमचे फेडू द्या
झाकोळलेल्या स्वप्नांना
आशेचा उजाळा द्या
अशा या सांजवेळी तिचा हात हाती घ्या
पाखरांना उडण्यासाठी
कायम त्यांचे मार्गदर्शक व्हा
