STORYMIRROR

Dhanshree Desai

Others

3  

Dhanshree Desai

Others

शाळा

शाळा

1 min
215

रात्री चा आलाराम लावून झोपलो खरे

 पण झोप मुळात येतेच कुठून...

पहाटेची घाई-गडबड

 पुन्हा एकदा सुरू झाली 

वह्या, पुस्तक कंपास, डबा 

दप्तरात भरण्यासाठी

 आम्हा मुलांची झाली घाई


युनिफॉर्म ,टाय ,सॉक्स आणि शूज

 घालून आम्ही छान तयार झालो

 दही साखरे सोबत; आई-बाबांचा घेऊन आशीर्वाद...

आज तब्बल दोन वर्षांनी 

आम्ही भेटणार आमच्या शाळेस आज

घेऊन शिस्तीचे धडे


 सवंगड्यांसोबत बागडण्याचे भाग्यच निराळे

 मॅडम सोबतच्या गप्पागोष्टी

 अभ्यासातल्या गमतीजमती 

आज पुन्हा नव्याने अनुभवणार

मोबाईलच्या विळख्यातून

 आज आमची सुटका होणार

 आम्ही मुले शाळेत जाणार 

आम्ही मुले शाळेत जाणार....!!



Rate this content
Log in