STORYMIRROR

Dhanshree Desai

Romance

3  

Dhanshree Desai

Romance

मन मोर पिसारा

मन मोर पिसारा

1 min
309

त्याच्या येण्याने मन पुन्हा होतं चिंब,

 मग हृदयाच्या कप्प्यात

 हलकेच उमटतं तिचं प्रतिबिंब 

आलीच वाऱ्याची झुळूक 

की मग आठवते 

तिच्या चेहऱ्यावर क्रीडा करणारी

 ती भुरकट बट!! 

आणि एकाच कपात घोट घोट

 करत शेअर केलेला 

तो वाफाळलेला चहा ;

पहिल्या पावसाचा 

तो मृदुगंध; तिच्या श्वासात 

ती भरून भरून घ्यायची 

अलगद पडणाऱ्या थेंबांनी 

मग हलकेच ती शहराची 

मन पुन्हा काहुरत

 आठवणीतच घुटमळत

 जपून ठेवलेल्या क्षणांना 

थांबून थांबून उधाणत

 नसली जरी ती माझ्यासोबत

 तरी पहिलं प्रेम पहिला स्पर्श 

का कोणी विसरत 

तुझ्या येण्याने

 ते पुन्हा पुन्हा प्रफुल्लित होतं

 आजही आठवणींच्या कप्प्यात 

जपून ठेवले तिला 

तू येतोस जेव्हा-जेव्हा 

मन सैरभैर होतं 

साठवलेल्या मोरपिसांचा 

फुलोरा फुलवू पाहत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance