मैत्री
मैत्री
1 min
191
मैत्री तुझी नी माझी
जशी झाडांवरून
ओघळणाऱ्या प्राजक्तासारखी,
मैत्री तुझी नी माझी
खळखळ वाहणाऱ्या
अल्लड झऱ्यासारखी ,
मैत्री तुझी नी माझी
अथांग सागरासारखी
जिथे शब्दही होतात रिते
आणि भावना होतात बोलक्या....
तुझ्या माझ्या मैत्रिला
ना वेळेच बंधन
न काळाची परिसीमा....
ही मैत्रीची परिभाषा....
सखे!
तुझ्या सारखी सखी;
प्रत्येकाच्या आयुष्यात असावी;
जणू परिसाच्या स्पर्शाने
आयुष्य सुवर्णमय करणारी.....
मैत्री तुझी नी माझी......!
