STORYMIRROR

Deepali Mathane

Inspirational

3  

Deepali Mathane

Inspirational

अक्षय सुख

अक्षय सुख

1 min
443

अक्षय राहो सुख तुमचे

वाहो समृद्धीची अक्षयधारा

तुमच्या आशा-आकांक्षांना

लाभो अक्षय पूर्तीचा किनारा

    दुःखाच्या सावटाचा कधी

    न लागो तुम्हास वारा

    अक्षय आनंदाने चमकू दे

    तुमचा ब्रम्हांड सारा

सुखाची ती व्याख्या

समजे तुम्हास पाहणारा

सुगंधी तुमच्या जीवनी

चढो सुखाचा तो पारा

    इष्ट देवतेच्या रूपात

    जागवे आसमंत सारा

    अक्षय सुखाच्या बरसो

    तुम्हावरी शीतल जलधारा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational