STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Romance

3  

Kalpana Nimbokar

Romance

अजुनही आहे प्रेम तुझ्यावर

अजुनही आहे प्रेम तुझ्यावर

1 min
380

कसा धरु मी राग तुझ्यावर

अजुनी आहे प्रेम तुझ्यावर

तुझ्याविना रे माझे अडते

नितांत आहे प्रेम तुझ्यावर


काळाचे भान ना राही

आठवणीची सरीता सतत वाही

कितीही धर तू अबोला मजशी

स्वप्न नयन तूझेच पाही


कसे समजु प्रेमच नाही

माझ्या हाकेला तू साद देई

तुझ्याविना रे विरान जीवन

जीव माझा वरखाली होई


भावना होती आज अनावर

मन विचारे हा हाल कुणावर

उत्तर कशी शोधु मी रे

उगाच आहे राग जगावर


मनातील सर्व तुलाच कळते

तरिही मन अबोल गमते

तुझ्या मनाची मी अधूरी कल्पना

आठवणीत तुझ्या सदाच वसते


लिहू कसे गीत तुझ्यावर

शब्द माझे हसती माझ्यावर

तुझ्याविना रे विरान जीवन

कारण ....अजुनही आहे प्रेम तुझ्यावर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance