STORYMIRROR

Shital Yadav

Romance

4  

Shital Yadav

Romance

अजरामर प्रीत

अजरामर प्रीत

1 min
607


हृदय स्पंदनी रमते भूतकाळात

अधीरता वाढते माझ्या मनाची

युगानूयुगे साक्षी हे चंद्र सूर्य तारे

अजरामर प्रीत राधा-कृष्णाची


कालिंदीच्या डोहाचे नीळे पाणी

भेटीचे तरंग जणू गातात गाणी

गर्द हिरव्या वनराईत मनमोहन

ऐकवितो मनमोहक अमृतवाणी


कधी तन होते लाजरी राधिका

मधुर बासरीने मन होई बेभान

ओढ लागते नयन कलिकांना

सावळ्यास भेटण्याची रे तहान


तृप्त होऊनी दर्शनाने हे तनमन

श्वास ही अर्पण तुज रे मधुसूदन

जन्म-जन्मांतरीची भक्ती अतूट

कृष्ण नामाने पावन झाले जीवन



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance