STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

4  

Deepali Mathane

Tragedy

अगतिकता......

अगतिकता......

1 min
191

पाठीवरी ओझे दिसे

पण दप्तराचे नाही

आशाळभूत नजरही

कधी शाळेकडे पाही

   माणुसकीच्या झऱ्याला

   पाझर फुटला नाही

   गरिबीच्या ओझ्याचा

   झरा आटला नाही

भाऊ-बहिण दोघांनाही

गरिबीचे ओझे पेलवे नाही

पण जिंकण्याची अजून

त्यांची ताकद हरली नाही

   उचलूनी भार सहाय्याने

   चिमुकला हात थकला नाही

  घरा हातभार लावतांना

  पाठीचा कणा वाकला नाही

अगतिकतेचा हा इशारा

कुणास कळला नाही

लेकरास या मदतीचा

एक हातही वळला नाही

   शोकांतिका ही समाजाची

   कधी संपणार नाही

   बालमजूरीचा अभिशाप

   येथे कमी पडणार नाही

 ढोंग अमाप दानाचे

 सत्यात फारसे नाही

कळवळा फक्त माध्यमांवर

हा दानाचा आरसा नाही   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy