अधिकाचा मज कांटाळा
अधिकाचा मज कांटाळा
अधिकाचा मज कंटाळा । तुम्हां गोपाळां संगति ॥१॥
काय नाहीं तुम्हापाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ध्रु.॥
उद्योगाचा नेघें भार । लागल्या सार पुरतें ॥२॥
तुका म्हणे अधीर जिणें । नारायणें न करावें ॥३॥
