अबोल प्रीती
अबोल प्रीती


अबोल प्रीत माझी
सख्या समजून घे
तुझ्यावरचे हे प्रेम
नयनात बघून घे..
भावना यां मनातील
हळूवार जाणून घे
हृदयातील कळीला
अलवार उमलू दे..
प्रीत राधा कृष्णाची
सप्तसुरात रंगली
तुझ्या प्रीतीच्या रंगात
सख्या अखंड दंगली..
स्वप्न वेडेपिसे छळते
पदोपदी रे मजला
स्वप्नांचा गोड बंगला
विश्वासाने हा सजला..
माझे अनोखे प्रेम हे
कसे सांगू मी रे तुला
बोलूनच का कळते
हेचि समजेना मला..
कधीतरी भावनाही
प्रिया समजून घ्याव्या
अबोल या शब्दांना
वाटा प्रीतीच्या द्याव्या..