अबोल प्रीत
अबोल प्रीत
भाव मनीचे
डोळ्यांत वाच माझ्या
तूच राजा
स्वप्नांचा
समजून घेणा
अबोल माझी प्रीत
नसे जनरीत
ठाऊक
राहावा सदा
समीप तू राजसा
छळतो कसा
विरह
बोलू कैसे
मिलनास मी आतुर
नकोच दूर
राहणे
तुजवरचे प्रेम
डोळ्यांत वाच माझ्या
नको गाजावाजा
प्रीतीचा