STORYMIRROR

Savita Jadhav

Romance

3  

Savita Jadhav

Romance

अबोल प्रीत

अबोल प्रीत

1 min
128

अबोल प्रीत

गवताच्या पात्यावर

टपोऱ्या दिसणाऱ्या 

दवबिंदूंसारखी


अबोल प्रीत

फुलाच्या पाकळ्यावर

अलगद भिरभिरणाऱ्या

फुलपाखरासारखी


अबोल प्रीत

अव्यक्त भावना

फक्त ईशाऱ्याने फुलवणाऱ्या

धुंद नशिल्या नयनासारखी


अबोल प्रीत

काहीच न बोलता

सगळं काही समजून घेणाऱ्या

एका जिवलगासारखी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance