आयुष्याच्या संध्याकाळी
आयुष्याच्या संध्याकाळी
आयुष्याच्या संध्याकाळी,शरिराची होते हानी !
दुखणी व्याधी,मागे लागती,वृद्ध जन त्यांसी म्हणती!!1
हातपाय, स्थिर नाही,अंगात त्राण राहिले नाही!
कामाची कुवत उरली नाही,घरात ही किंमत नाही!!2
किरकोळ गोष्टी, करती कुरबुरी, एकमेकांत खटके पाडिती!
वृत्ती होते एकलकोंडी, शेवटी वृद्धाश्रमी घालती!!3
अडगळीच्या सामानापरि,बंद खोलीत राहती,
घरात असूनी,ना घरात राही,पराधीन जीवन जगती!!4
वृद्धाश्रमात जरी जाती,मन घरातच राही!
नातवंडांच्या बोबड्या बोलीत,बालपण शोधी!!5
घराची वेस ओलांडता,मायेला पारखी होती!
निरोप देऊन न येती,रक्ताची नाती तोंड फिरवीती!!6
आयुष्य घातले ज्यांच्यासाठी,तिच लोटूनी देती!
मोठे केले चिमटा घेऊन, तिच त्यांना छळती!!7
परकी वाटणारी नाती,तिच कामी येती!
माणुसकिचा दिवा तेवती,मदतीचा हात देती!!8
जीवनाची ही अवस्था, प्रत्येका वाटी येती!
विसर न व्हावी उपकाराची,वेळ ऋण फेडण्याची !!9
प्रेमाने उमजेल जे,नातवंडांना ,आजा आजी मिळतील!
समजून उमजून जे वागतील,घट्ट,होती ऋणांची नाती!!10
सरत्या वयात आधाराची, जिवलगांच्या प्रेमळ शब्दांची!
मानसिकतेची गरज आहे, वृद्धांना समजण्याची !!11
