आयुष्य
आयुष्य


जीवन प्रश्नास उत्तर भविष्य देते
काय वळण आता आयुष्य घेते
स्मृती कित्येक हृदयी गतकाळाच्या
कोरल्या जणू या नशीबी भाळाच्या
सुगंधाविना या फुलांचे अस्तित्व जसे
संघर्षाशिवाय यशालाही किंमत नसे
नको हेळसांड या बहुमोल जीवनाची
द्यावी गती आयुष्याला नव विचाराची
सुखांसोबत दुःखांनाही लागते भोगावे
सौजन्याने सकलांशीच मायेने वागावे
अखेरतः होईल राख जीव देहधारी
जिवंत राहील सदा फक्त परोपकारी
जन्म हा मानवाचा सार्थकी लागावा
सत्कार्याचा जगी ऐसा ठसा उमटावा