STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Inspirational

3  

DATTA VISHNU KHULE

Inspirational

आयुष्य रंग

आयुष्य रंग

1 min
229

जीवनी बहु खडतर प्रवास

कधी होतो कोंडतो आपुला श्वास

कधी होतो आपुला दमछाक

तरीही जीवन जगत पुर्ण होई आयुष्य घाट


जगताना जीवन आयुष्य लय अवघड

जीवाची आपुल्या बहू तडफड

आयुष्य हे सायकलीच्या चाकासमान

साधावा लागतो समतोल त्या चाकासामन


तोल संभाळण्या करिता

चालवत राहावे लागते

जरी थांबले तर आपुले अस्तित्व संपते

शेवटी गतिशीलांचे महत्व अबाधित असते


आयुष्य हा बहू खडतर घाट

दऱ्याखोऱ्याची , काट्याकुट्याची ती वाट

कधी लागतो चांगला रस्ता कधी दगडी पायवाट

आयुष्य स्वतःच सावरायचं असत पायवाटेतूनी 


पुढे पुढे मार्गस्थ व्हायच असत

कधी कुणी सोबती तर एकटच अंतर

आपल्यालाच कापायचं असतं

जीवन आपुले नावीन्यतेकडे वळवायचं असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational