आठवतात ते दिवस......
आठवतात ते दिवस......
आठवतात ते दिवस,
जेंव्हा आयुष्य होते रिवर्स....
शाळेच्या आवारात, जेंव्हा तिला पाहिलं होतं,
त्याच दिवशी जीवन माझ, तिच्यासाठी वाहिल होतं...
वरळीच्या कट्यावर,
दोघे आम्ही बसायचो,
एकमेकांच्या खांद्यावर,
डोके ठेवून रडायचो..
साथ तुझी मी कधी सोड़नार नाही,
असे वचन मला होते दिले..
भविष्याची स्वप्ने दाखवून तिने,
लग्न मात्र दुसरयाशी केले..
तिने लिहिलेली पत्रे ,
मी अजुन ठेवली होती जपुन..
मन बेचैन झाल्यावर,
मी वाचायचो लपून छपुन....
चेहऱ्यावरील तिळ तिचा,
खुप भाव खायचा,
ती समोरून गेली की,
माझा टेबल फॅन व्हायचा..
खुप निर्मळ मन होते तिचे,
अन गोड होता स्वभाव.
गरीब ह्या पामरा समोर,
तिने कधीच नाही आणला, श्रीमंतीचा आव..
एक दिवशी, तिची बातमी आल्यावर,
काळीज माझे हेलावले,
देवाला ही ती, इतकी आवडली की,
त्याने ही तिला बोलवले, त्याने ही तिला, बोलावले.....

