आठवतात का रे..
आठवतात का रे..
आठवतात का रे..ते क्षण तुला
नजर भेट झाली होती पहिल्यांदा
मन लाजरे बुजरे झाले होते
त्यावेळी आणि नंतर ही कितीदा
आठवतात का रे... ते क्षण तुला
तू माझ्या आयुष्यात
बहर घेऊन आला
आकाशाला कवेत घेतलेला इंद्रधनुष्य नुकताच फुलावा असा आयुष्याचा हा भाग अगदी मोहक दिसत होता पावसाच्या सरींनी मातीला गंध द्यावा जसा
हातात हात गुंफले होते पहिल्यांदा जन्मलो फक्त एकमेकांसाठी सुखावलो तेव्हा आणि नंतरही कितीदा..
आठवतात का रे...ते क्षण तुला
तुझ्या सहवासात दिवस कधी संपायचा हे समजत नव्हते मला तू फक्त सोबत असावा हेच हवं होतं मला..
आठवतात का रे ...ते क्षण तुला
घेतल्या आपण आणाभाका पहिल्यांदा जगणं आणि मरणं हे बरोबरच या जन्मी आणि नंतर ही कितीदा..

