STORYMIRROR

Mahesh Patil

Inspirational

4  

Mahesh Patil

Inspirational

आठवणीतली तू !!

आठवणीतली तू !!

1 min
749


आठवणीतली तू

आठवणीतला मी,

दोघे आहेत तिथेच

भेटली होतीस जिथे तू.


तू अवखळ मी अवखळ

तू निरागस मी निरागस,

तू रागीट मीही रागीट

तू प्रेमळ मग मीही.


नसलो जरी तसा मी

प्रयत्न मात्र तोच होता,

तुझ्याशी जुळवून घेण्याचा

कायमच तुझ होण्याचा.


जिंदगी किती झ्याक होती

जणू लाटांवरची नाव होती,

आता पडतो कि काय प्रेमात

अस म्हणायची सोय होती.


पण हे झाले आठवणीतले

मनात ठेवलेल्या साठवणीतले,

सर कस विरून गेल

सरणावर जस प्रेत,

हृदयाच्या भिंतीत

बाण घुसले अनेक.


कितीजरी ठरवल तुला विसरायचं

नाही जमत मला कारण

आठवणीतला मी,

अजून आहे तिथेच

जिथे आहेस तू ,

आठवणीतली.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational