आठवणीत माझ्या आहे
आठवणीत माझ्या आहे
कधी जगलो आपण
करुन भविष्याच्या कल्पना
विसरला जरी तू
आठवणीत माझ्या आहे
प्रित ही अनमोल होती
एकेकाळी तुझ्यासाठी
गुंतली आज तू संसारी
पण आठवणीत माझ्या आहे
आजही एकांती आठवून
कधी आठवणींना तुझ्या
नयने झरती रिमझिम
जणू जखम उरात आहे
मैफीलीत तुझ्या आता
स्थान जरी नाही मला
पण तुझ्या आठवणी
एकांतात माझ्या आहेत
