STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy

3  

Supriya Devkar

Tragedy

आठवणींचे पक्षी फुलवतात पिसारा

आठवणींचे पक्षी फुलवतात पिसारा

1 min
12K

आठवणींचे पक्षी फुलवतात पिसारा एकांती

झळकू लागते क्षणाक्षणाने गोरी तुझी कांती 


उबदार आठवणींच्या चादरीत घ्यावे लपेटून 

चादंण्यांच्या अंगणात विचारांनी जावे झपाटून 


आठवणींचे पक्षी करती माळावर गलका 

सुमधूर किलबिलाटाने मळा होई हलका 


आंबट-गोड फळे शेलकी देती जीवनाला स्वाद 

आस्वाद घ्यावा क्षणोक्षणी बाजूला ठेवूनी वाद 


आठवणींचे पक्षी पाहती वाट आपल्या पिलांची

पंखांना लावून बळ उंच भरारी मारणारांची


पाहते हे घर विखुरलेले वाट वाकडी करा जरा

पिल्लांसोबत आसऱ्याला या घरी तुम्ही जरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy