STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

आठवणी आईच्या...

आठवणी आईच्या...

1 min
252

आठवणी आईच्या

जाग्या हाेतात,

तिला आठवून

डोळे पाणावतात

आठवणी आईच्या

झाेपू देत नाही,

मला जाेजावतांना

गात होते अंगाई

आठवणी आईच्या

ह्दयात जागतात,

सहवासातील लाेक

तिचे गुणगान गातात

आठवणी आईच्या

काळजात चीर पाडतात,

तिला आठवून मन

धाय माेकलून रडतात

आठवणी आईच्या

कुपीतल्या अत्तरावाणी,

तिच्या जाण्याने येते

डाेळ्यात टचकन पाणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational